
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण दि.७: जैन समाजातील सहा जिल्ह्यांची प्राथमिक संघटना असलेल्या सन्मती सेवा दलाच्यावतीने जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिखरजी (झारखंड) येथील पार्श्वनाथ पहाडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सन्मती सेवा दलाच्या या अभियानाचे हे दहावे वर्ष आहे.
यंदाच्या अभियानासाठी 35 स्वयंसेवक सहभागी झाले असून यामध्ये सेवा दलाचे संस्थापक मिहीर गांधी, मयुर गांधी, वीरकुमार दोशी, महावीर दोशी, विनोद दोशी, शुभम शहा, राजेश दोशी, संदेश गांधी आदींचा समावेश आहे.
