राजस्थानी विष्णू समाजाकडून श्रीराम आनंदोत्सव साजरा


दैनिक स्थैर्य | दि. २५ जानेवारी २०२४ | बारामती |
बारामतीमध्ये सर्व राजस्थानी विष्णू समाजाकडून व्यावसायिक दुकाने बंद ठेवून अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त मोठ्या उत्साहाने कार्यक्रम घेण्यात आला.

भव्य मिरवणूक काढून ‘जय श्रीरामा’च्या घोषणा देत, भगव्या पताका लावून, राजस्थानी बांधवांनी मोठ्या थाटामाटात प्रभू श्री रामाचे स्वागत करून संध्याकाळी भजन, कीर्तन व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रणसिंग राठोड, जगमालसिंह राजपूत, पूनम सिंग राव, सुजान सिंह चौहान, पेहलाजी मकवाना, मोतीराम चौधरी, नरपत कुमार प्रजापती, दर्गा राम चौधरी, निंबा राम चौधरी, घीसाराम चौधरी, मालाराम प्रजापती, नरपतसिंह राजपुरोहित, मंचाराम सुथार, सतीश देवासी, हरिश जाट, दिनेश प्रजापती, ताराराम देवासी आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!