
दैनिक स्थैर्य । 24 जुलै 2025 । फलटण । येथील श्री संत गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिरात श्रावण मासाच्या औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्त दररोज सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत श्री ज्ञानेश्वरी निरूपणाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री ज्ञानेश्वरी निरूपणाच्या नंतर सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ संपन्न होणार आहे.
तरी भक्तांनी अवष्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.