श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात श्री ज्वालामालिनी देवी विधान अतिशय आनंदात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
संगिनी फोरम फलटणमार्फत नवरात्रीनिमित्त मंगळवार, दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व संगिनी फोरम सदस्या व पदाधिकारी यांच्या सहकार्याने व उत्स्फूर्त सहभागाने श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, नवी पेठ, फलटण येथे श्री ज्वालामालिनी विधान वडूज येथील प्रसिद्ध विधानाचार्य श्री दिनेशभैय्या उपाध्ये यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

फलटणनगरीला दक्षिणेकडील जैन समाजाची काशी संबोधले जाते. या जैनांच्या काशीमध्ये म्हणजेच फलटण नगरीमध्ये श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, नवी पेठ येथे महाराष्ट्रातील एकमेव अशी मोठी संगमरवर पाषाणातील सुबक व कलाकुसरीने संपन्न असलेली ज्वालामालिनी देवीची मूर्ती विराजमान केलेली आहे. या देवीवर महिलावर्गाची एवढी श्रध्दा आहे की अनेक ठिकाणांहून भक्तगण या देवीच्या दर्शनासाठी येतात. येथे नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्यासाठी महिलांची भरपूर गर्दी असते.

सकाळी ८ वाजता अभिषेक, ९ वाजता पंचपूजा संपन्न होऊन सकाळी १० वाजता ज्वालामालिनी विधान सुरू करण्यात आले. विधानासाठी सुंदर अशी आरास करण्यात आली होती. देवीसाठी सर्व शृंगार व विविध पदार्थांची पात्रे सजविण्यात आली होती.

हे विधान संपन्न होण्यासाठी श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर विश्वस्तांचे सहकार्य लाभले. तसेच स्थानिक पंडित श्री महावीरभाऊ उपाध्ये यांचेही मोठे योगदान लाभले. संगिनी फोरमच्या सर्व सदस्यांनी तन-मन-धनाने सहभाग नोंदवून श्री ज्वालामालिनी देवी विधान संपन्न करण्यास अमूल्य असे योगदान दिले.

विधानामध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व मंदिर समितीचे विश्वस्त श्री मंगेश दोशी, विश्वस्त समितीचे खजिनदार श्री. अरिंजयकाका शहा, विश्वस्त श्री. राजेंद्र कोठारी, माजी विश्वस्त श्री. शशिकांत काका दोशी, जैन सोशल ग्रुप उपाध्यक्ष श्री. श्रीपाल जैन, संगिनी फोरम संस्थापक अध्यक्षां सौ. स्मिता शहा, सौ. विद्या चतुर, संगिनी फोरम अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, सचिव सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ. मनिषा घडिया, उपाध्यक्ष सौ. मनिषा व्होरा, माजी अध्यक्षा सौ. नीना कोठारी, माजी सचिव सौ. दीप्ती राजवैद्य, सौ. पौर्णिमा शहा, सदस्या सौ. जयश्री उपाध्ये, सारिका सागर दोशी, सौ. संध्या महाजन, सौ. निलम डुंडुं, सौ. किशोरी शहा, सौ. अलका पाटील, सौ. संगीता जैन, सौ. नेहा दोशी, सौ. सारिका पूनम दोशी, सौ. वृषाली गांधी, सौ. सुरेखा उपाध्ये तसेच बहुसंख्य श्रावक – श्राविका, संगिनी सदस्या उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!