फलटण आगारात श्री दत्त जयंती उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२३ | फलटण |
फलटण बस स्थानकावर सालाबाद प्रमाणे दि. २६ रोजी श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

श्री दत्त जयंतीनिमित्त सकाळी स्थानकप्रमुख राहुल वाघमोडे यांचे हस्ते सपत्नीक महाअभिषेक संपन्न झाला. दुपारी १२ ते २ श्री. जीवनदास एकतारी भजनी मंडळ, वाठार निंबाळकर यांचा सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

दुपारी ४ ते ६ युवा किर्तनकार ह.भ.प. श्री. राहुल महाराज मासाळ यांचे जन्मकाळाचे किर्तन संपन्न झाले. सायं. ६ वाजता श्री दत्त जन्मकाळ, पाळणा संपन्न होऊन आगार व्यवस्थापक रोहित नाईक, स्थानकप्रमुख राहुल वाघमोडे, सहाय्यक वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे, सुखदेव अहिवळे, उत्सव समिती अध्यक्ष सुनिल बोंद्रे, संजय टाकळे, माऊली कदम, सच्चिदानंद शेलार, महेश गोसावी यांचे उपस्थीतीत आरती संपन्न होऊन सर्वाना सुंटवडा वाटप करण्यात आला.

बुधवार, दि.२७ रोजी दुपारी १२ वाजता ‘श्रीं’ची आरती संपन्न होऊन महाप्रसाद भंडारा संपन्न झाला. सर्व कार्यक्रमासाठी भावीक भक्त, प्रवाशी व कर्मचारी बंधू-भगीनी यांची बहुसंख्येने उपस्थीती होती. प्रतीवर्षी कर्मचारी बंधू-भगीनी, अधिकारी यांच्या सहकार्याने व देणगीतून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. फलटण शहरातील असंख्य भाविक श्री दत्त दर्शनासाठी गुरुवारी तसेच श्री दत्त जयंती कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत असतात.

यावेळी अयोध्येवरून आलेल्या अभीमंञित कलशाचे श्री दत्त मंदिरात आगमन झाले. सर्व भाविकांनी जय श्रीरामच्या घोषात मंगल कलशाचे दर्शन घेतले. उत्सव संपन्न होण्यासाठी फलटण आगारातील कर्मचारी, अधिकारी, प्रवाशी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.


Back to top button
Don`t copy text!