दैनिक स्थैर्य | दि. १८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
गारपीरवाडी, ता. फलटण येथे परमपूज्य ब्रह्मलीन महामंडलेश्वर वैराटवासी स्वामी आबानंद गिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला.
शनिवार, दि. १७ फेब्रुवारी ते शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह असून या सप्ताहाची सुरूवात ग्रंथपूजन, कलश पूजन व विनापूजन करून ग्रामस्थ व महिला मंडळ गारपीरवाडी यांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला.
दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७.३० ते ११.३० ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ६ ते ७ प्रवचन, सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन, नंतर हरिजागर होणार आहे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ चालक हभप अनिल महाराज कुंभार (आळंदी) हे आहेत. मृदंगमणी हभप ओंकार महाराज ढाणे (नांदल) व गायनाचार्य हभप कांता भांडवलकर, बाळासाहेब जाधव, दशरथ करे, अण्णा मदने व विणेकरी हभप पंडित गोडसे, हभप प्रकाश भोसले, हभप दत्तात्रय लोंढे, हभप पडळकर तर चोपदार हभप पंढरीनाथ गोडसे यांचे होणार आहे.
या सप्ताहात शनिवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी हभप पियुष कापसे (गारपीरवाडी) यांचे प्रवचन व रात्री ९ ते ११ बालकीर्तनकार आदित्य महाराज गावडे (अकलूज) यांचे कीर्तन, नंतर महिला भजनी मंडळ गारपीरवाडी यांचा हरीजागर झाला.
रविवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ हभप सुलोचना हिप्परकर यांचे प्रवचन व रात्री ९ ते ११ हभप रामकृष्ण डोंगरे महाराज (बोडकेवाडी) यांचे कीर्तन होईल.
सोमवार, दि. १९ रोजी सायंकाळी ६ ते ७ हभप कुंडलिक कुंदळे यांचे प्रवचन तसेच रात्री ९ ते ११ हभप संतोष महाराज पवार (मांजरवाडी) यांचे कीर्तन होईल.
मंगळवार, दि. २० रोजी सायंकाळी ६ ते ७ हभप अनिल महाराज कुंभार यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११ हभप विश्वास महाराज कोळेकर (नांदल) यांचे कीर्तन होईल.
बुधवार, दि. २१ रोजी सायंकाळी ६ ते ७ पुष्पाताई कदम (फलटण ) यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११ हभप अनिल महाराज कुंभार (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे.
गुरुवार, दि. २२ रोजी सायंकाळी ६ ते ७ हभप विश्वास महाराज कोळेकर (नांदल) यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११ शालनताई सत्रे (मुंबई) यांचे कीर्तन होईल.
शुक्रवार, दि. २३ रोजी सायंकाळी ६ ते ७ हभप रमेश कट्टे (फलटण) यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११ हभप धनंजय महाराज चव्हाण (दहिगाव) यांचे कीर्तन होईल.
शनिवार, दि. २४ रोजी काल्याचे किर्तन हभप कविराज महाराज जावरे (पारनेर) यांचे होणार आहे.
या सप्ताहात विविध अन्नदाते अन्नदान करणार आहेत. सर्व भाविक भक्तांनी तन, मन व धनाने श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व महिला मंडळ गारपीरवाडी यांनी केले आहे.