श्रीमंत शिवरूपराजे माझ्या आधी सभापती होते; माहिती घेवून आरोप करावेत : श्रीमंत विश्वजितराजे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 17 ऑगस्ट 2024 | फलटण | श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर हे राजकारणात ज्येष्ठ असल्याने त्यावेळी त्यांना सभापती करण्यासाठी मी माघार घेतली होती. तेंव्हा ते पंचायत समितीचे सभापती झाले होते. त्यानंतर अगदी शेवटचे काही महिने मी सभापती होतो. याबाबत विरोधकांनी माहिती घेवूनच बोलावे; असा टोला फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे यांनी लगावला आहे.

याबाबत अधिक बोलताना श्रीमंत विश्वजीतराजे म्हणाले की; सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांना तुम्ही तुमच्या गटामध्ये घेऊन पद देणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. तुम्ही माणिकराव सोनवलकर यांना जर पद दिले तर तुमच्या गटातील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होवून गट सोडून जातील. तुम्ही जरा स्वतःच्या गटावर फोकस ठेवा. त्यामुळे तुमचा गट फुटणार नाही; असे मत फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सदरील माहिती फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअप स्टेटसद्वारे शेअर केली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!