तृणधान्य महोत्सवास शिवेंद्रसिंहराजेंची सदिच्छा भेट


सातारा  तृणधान्य विभागीय महोत्सव आणि प्रदर्शन स्टॉलची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले  व इतर मान्यवर. (छाया :  अतुल देशपांडे, सातारा )
स्थैर्य, 10 मार्च, सातारा : येथील पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत विभागीय प्रदर्शन तृणधान्य महोत्सव आणि प्रदर्शन तसेच विविध विक्री उत्पादने स्टॉलला राज्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट देऊन संयोजकांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तृणधान्याची ओळख सर्वसामान्य नागरिकांना समजावी तसेच त्यातील पौष्टिक गुणधर्म आणि मूल्य जोपासत आपल्या आरोग्याच्या सुधारणासाठी ही तृणधान्ये दैनंदिन आहारात वापरावीत असे आवाहनही नामदार भोसले यांनी यावेळी केले. असे प्रदर्शन दरवर्षी भरवून सामान्य नागरिकांचा आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी तृणधान्य महोत्सव निश्चितच महत्त्वाचे उपयोगी काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .प्रदर्शनाचे नेटके नियोजन, स्टाँलची आकर्षक मांडणी याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व कृषी अधिकारी यांनी नामदार भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांना प्रदर्शनाची विविध स्टॉलची पाहणी करताना विस्तृत माहिती दिली. यावेळी संयोजक आणि स्मार्ट होते प्रमुख संचालक सोमनाथ शेटे यांचीही उपस्थिती होती .


Back to top button
Don`t copy text!