आ. शिवेंद्रसिंहराजेंमुळे शाहुनगरमध्ये होणार नवीन पाईपलाईन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021। सातारा।  शाहूनगर परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्येत कमालीची वाढ होत आहे. नवीन पाईपलाईनची वाढती मागणी, जुन्या पाईपलाईनला सतत लागणारी गळती, अपुरा आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा यामुळे शाहुनगर परिसरातील नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे भविष्याची गरज ओळखून शाहूनगरमधील पाईपलाईन बदलण्याच्या सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या आहेत.
पाणीपुरवठा योग्यरीत्या होत नसल्याने पाईपलाईन बदलण्याची वेळ आली असून योग्य व्यासाची पाईपलाईन टाकण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होवू लागली. याबाबत नागरिकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन हि समस्या सोडवण्याची मागणी केली. त्यानंतर शाहुनगर, जगतापवाडी परिसरात १६० मीमी व्यासाची नवीन पाईपलाईनसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचित केले आहे. तत्काळ जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद करून नवीन पाईपलाईन टाकावी अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी ऋतुराज देशमुख, मंदार कोळी, संदीप जगताप, नीतीराज सूर्यवंशी, विनोद धुमाळ, राजेश कदम यांच्यासह शाहुनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!