सराईत चोरास फलटण पोलीसांकडून शिताफीने अटक


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । फलटण ।  फलटण शहर हद्दीतील गोळीबार मैदान परिसरात घडलेल्या गंठणचोरीतील आरोपीस फलटण शहर पोलीसांनी गोपनिय माहिती द्वारे शिताफीने अटक केली.

याबाबत फलटण शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.9 जून 2021 रोजी सकाळी 7:45 च्या सुमारास गोळीबार मैदान येथील पर्णकुटी अपार्टमेंटच्या पाठीमागे सस्ते यांच्या बंगल्याशेजारी फिर्यादी वॉकींग करुन घरी जात असताना अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीचे मिनीगंठण जबरीने हाताने तोडून घेवून चोरुन नेले होते. सदरचा गुन्हा सराईत गुन्हेगार सुरेश रमेश कदम (वय 22 वर्षे), व्यवसाय मजुरी काम, रा.धुळदेव (ता.फलटण), सध्या राहणार ब्राह्मण गल्ली, फलटण याने केला असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार दि.7 जुलै 2021 रोजी संबंधीत आरोपी हा शहरातील गजानन चौक येथे सकाळी येणार असल्याची खात्रीशीर खबर मिळाल्यानंतर फलटण पोलीसांनी त्याला सापळा रचून मोठ्या शिताफीने मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

आरोपीकडे पोलीसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने एकूण 3 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून वरील नमूद गुन्ह्यातील चोरी केलेला सोन्याचा मुद्देमाल, मोबाई हॅन्डसेट तसेच मोटारसायकल सह असा एकूण 84 हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरच्या कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस नाईक अशोक वाडकर, नितीन भोसले, शरद तांबे, विक्रांत लावंड, पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय सांडगे, अच्युत जगताप यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!