कळसुबाई शिखरावर पोहोचलेले व्यसनमुक्त युवक संघाचे शिलेदार ह.भ.प. बंडा तात्या कर्हाडकर यांच्या समवेत
स्थैर्य, फलटण दि. १९ : कळसुबाई, जि. अकोला येथील महाराष्ट्रात सर्वात ऊंच असणारे कळसुबाई शिखर व्यसनमुक्त युवक संघाच्या शिलेदारांनी आज (गुरुवार) भल्या पहाटे सर करुन एक आगळी वेगळी मोहीम यशस्वी केली. व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक युवकमित्र संतवीर ह.भ.प. बंडातात्या कर्हाडकर हे नेहमी अशा पद्धतीच्या धाडसी मोहिमा राबवून यशस्वी करीत असतात.
ऐन दिवाळीच्या सणा दरम्यान महाराष्ट्रातील बंद असलेली मंदिरे खुली करण्यासाठी ह.भ.प. बंडा महाराज कऱ्हाडकर यांनी महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका करीत दिपावलीच्या पहिल्या (आंघोळीच्या) स्नानाच्या दिवशी ’शिमगा’ करुन शासनाच्या मंदिर बंद कृतीचा निषेध केला होता, त्याच दिवशी सरकारने मंदिरे व प्रार्थना स्थळे खुली करुन सर्व जनतेची दीपावली गोड केली होती, त्यावेळीही सर्वात अगोदर ह. भ. प. बंडातात्या कर्हाडकर यांनी शासनाचे अभिनंदन केले होते.
सतत समाजाला प्रेरणा देणारे नवीन उपक्रम ते राबवीत असतात दिपावलीच्या सणात त्यांनी कळसूबाई शिखर सर करण्याची मोहीम आखली आणि दि. १९ नोव्हेंबर रोजी भल्या पहाटे व्यसनमुक्त युवक संघाच्या शिलेदारांना समवेत घेऊन त्यांनी ते सर केले.
या मोहिमेत महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, अकोला या जिल्ह्यातील युवकांनी दि.१८ च्या पूर्व संध्येला मुक्कामी चितळवेढे, ता.अकोले या गावी संघाचे शिलेदार माऊली आरोटे यांच्याकडे जाऊन दि. १९ च्या गुलाबी थंडीत शिखर चढायला सुरुवात केली सुरुवातीचा शिलेदार एक तास २२ मिनिटांत शिखरावर पोहोचला, त्या पाठोपाठ इतर शिलेदारही पोहोचले, या भागातील निसर्गाचे अप्रतिम रुप, पाखरांचा किलबिलाट, पूर्व दिशेने उगवणारे सूर्याचे प्रतिबिब सर्व विलोभनीय नजारा सर्वांना अनुभवायला मिळाला.
या आणि अशा अनेक मोहिमा व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून राबविल्या जातात, आग्रा ते राजगड हा सुमारे १४०० कि. मी. चा पायी प्रवास, पन्हाळगड ते विशाळगड, पुरंदर ते वढू तुळापूर, संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी ते वढू तुळापूर पायी प्रवास करुन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास युवकांनी जगला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात.
श्रीराम जवाहर साखर उद्योगाचे सुमारे दीड कोटीहून अधिक पेमेंट ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा
ज्या राष्ट्रासाठी छत्रपतींनी आपले आयुष्य खर्ची घातले तो इतिहास आपण पाहिलाच पाहिजे, छत्रपतींचे गडकोट किल्ले मोहीमा आयोजित करणे काळाची गरज असून व्यसनमुक्त युवक संघ यासाठी कायम प्रयत्नशील राहील याची ग्वाही संघाचे प्रांताध्यक्ष शहाजी काळे यांनी दिली आहे.
एप्रिल २०२१ मध्ये किल्ले शिवनेरी ते रायगड अशी चौदा दिवसांची मोहीम राबविण्यात येणार असून असंख्य युवकांनी याची प्रेरणा घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन शहाजी काळे यांनी केले आहे.