
स्थैर्य, सातारा, दि. 18 : जावली तालुक्यातील माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांची राजकीय घौडदौड सुरू आहे.जावली खोऱ्यापासून आमदारकीला झालेली सुरुवात कोरेगावात तशीच सुरू होती.नुकतीच त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे. पक्षाचे सर्व्हेसर्व्हा शरद पवार यांनी त्यांना पुन्हा आमदार केले.
वाशीत माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवता सोडवता जावली तालुक्याचे राष्ट्रवादीचे पहिले आमदार शशिकांत शिंदे हे झाले. तेव्हापासून त्यांचे राजकिय पटलावर स्वतःची एक वेगळी छाप निर्माण केली आहे आक्रमक बाणा, वक्तृत्व कॊशल्य, समाजासाठी कार्य करण्याची असलेली तळमळ यामुळे जावळी तालुक्यातील जनतेने त्यांना उचलून घेतले. 1999 आणि 2004 ला जावलीतून आमदार तर त्यानंतर कोरेगावातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिले. गत पंचवार्षिकमध्ये सत्ता नसताना ही त्यांनी जिल्ह्यातील पक्षाचे अस्तित्व ठेवून त्यामध्ये भर घालण्याचे काम केले. फडणवीस सरकारच्या विरोधात त्यांनी जिल्ह्यातील अनेक आंदोलने केली. मराठा क्रांती मोर्चात महत्वाचा वाटा उचलला.लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाची बाजू खंबीरपणे पेलली.धडाडती तोफ जावलीचा ढाण्या वाघ एखाद्याचा कार्यक्रम करतो म्हणून करणारच, हे त्यांच सूत्र. समाजाच्या कामासाठी त्यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. आता खासदार शरद पवार यांनी पुन्हा त्यांना आमदार केले आहे. त्यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली आहे.