दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । सातारा । नागठाणे (ता. सातारा) येथे नुकतीच शरीसौष्ठवं स्पर्धा सातारा श्री 2022 संपन्न झाली. या स्पर्धेत सातारा श्री २०२२चा मानकरी शरिफ पांढरे यांनी पटकावला जि. डी. जीम. सातारा/नागठाणे आयोजित आणि फिटनेस अँड बाॅडी बिल्डर असोसिएशन सातारा जिल्हा यांच्या मान्यतेने नागठाणे येथे शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आली. जि.डी.जिमचे सुशांत माने, मयूर साळुंखे, प्रदीप साळुंखे, विपुल शेटे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. या स्पर्धेत एकूण १२०स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत ज्युनिअर सातारा श्री स्पर्धेत १) रोहीत निकम. २)शुभम जाधव. ४) अजय पटेल. ५) अक्षय आडसुळ. ६) संकेतनिकम. ७)आदीत्य डाळे. ८) स्वप्निल पवार. ९) ओंकार कुंभार. १०) विजय अडागळ. यांनी क्रमांक पटकावला. तसेच मेन्स फिजीकल मध्ये प्रथम क्रमांक हर्षवर्धन साळुंखे.द्वितिय.पवन पवार तृतीय क्रमांकआदित्य ढाणे.चौथा क्रमांक अजय पटेल पांचवा क्रमांक कुणाल जाधव यांनी यश मिळवले. सिनियर सातारा श्री.१) शरिफ पांढरे. २) हषॅवधन साळूंके ३) रोहित निकम ४)शुभम जाधव. ५) कुणाल जाधव. ६) किरण भोसले. ७) रोहित जाधव. ८) शैलेश घाडगे. ९) अक्षय महाडिक. १०) विकी पाचगणे. ११) संजय केसकर. १२) अजय पटेल. १३) सचिन शिंदे १४)लखन आडगे. १५) राजु कांबळे. बेस्ट पोझर. शुभम जाधव यांनी यश मिळवले.
या स्पर्धेत प्रमुखपंच म्हणून राष्ट्रीयपंच मनोजकुमार तपासे,राष्ट्रीय पंच राजेंद्र धादमे, राष्ट्रीयपंच अतुल उबाळे, राज्यपंच व महाराष्ट्र श्री अशोक चव्हाण आणि जिल्हापंच सुशांत माने यांनी काम पाहिले तसेच स्टेज मार्शल म्हणून विनायक बर्गे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमास मनोहर साळुंखे, अजित साळुंखे , गणेश ठोके, गिरीश ठोके, निखिल केंजळे, अनिल साळुंखे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर साळुंखे यांनी केले तर प्रदीप साळुंखे यांनी आभार मानले.