दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । सोळशी । महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सोळशी येथील शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्यावतीने शनि अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज शनि महाराज यांनी सांगितले की गेली दोन वर्षे झाली कोरोना या महाभयंकर आपत्तींने कोणतेही धार्मिक विधी तसेच सण उत्सव साजरे करता आले नाहीत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून यावर्षी शनि अमावस्या साजरी करत आहोत यामध्ये सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर व सर्व रोग निदान चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये एम.डी असणारे डॉ.सुभाष घेवारी हे रुग्णांना मोफत तपासणार आहेत याच ठिकाणी औषधोपचार करणार आहेत डॉ. सुभाष घेवारी हे गेली पाच वर्षे झाली या शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या येथे मोफत रुग्णांना औषधोपचार करत आहेत यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना स्वरक्षणासाठी देवस्थान ट्रस्टकडून हेल्मेट दिले जात आहे या शनि अमावस्या निमित्ताने आज देवस्थान ट्रस्ट व परमपूज्य नंदगिरी महाराज यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे व शनि महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी लांबवरून भक्तगण सोळशी येथे दाखल होत आहेत