राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत शंभूराज गोफणेचे रौप्यपदक; राजाळे विद्यालयाची मान उंचावली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

मूर्तीजापूर येथील राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात शंभूराज गोफणे याने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.

स्थैर्य, फलटण, दि. ०८ ऑक्टोबर : मूर्तीजापूर, अकोला येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत राजाळे येथील श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी शंभूराज दत्तात्रय गोफणे याने रौप्यपदक पटकावून दैदिप्यमान यश मिळवले. १४ वर्षांखालील ५० किलो वजन गटात झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत त्याने प्रतिस्पर्ध्यावर मात करत द्वितीय क्रमांक मिळवला.

संस्थेकडून कौतुकाचा वर्षाव
शंभूराजच्या या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सविता सूर्यवंशी, मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी, तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य जाधव आणि शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले. क्रीडाप्रेमी व मित्रपरिवाराकडूनही शंभूराजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!