फलटणमध्ये १५ वे यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलन; काय आहे वैशिष्ट्य?

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटणमध्ये २५ नोव्हेंबरला १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आणि म.सा.प. नांदी संमेलन होणार आहे; पाहा सविस्तर वेळापत्रक व मान्यवरांची नावे.

स्थैर्य, फलटण, दि. २३ नोव्हेंबर : फलटण येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, श्री सद्गुरु प्रतिष्ठान आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे नांदी संमेलन आयोजित केले आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत महाराजा आयकॉन सभागृह, डी. एड. चौकनजिक, फलटण येथे हे संमेलन होणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे हे संमेलन राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे छोटेखानी स्वरूपात घेतले जात असल्याचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष सचिन सूर्यवंशी बेडके आणि म.सा.प. फलटण शाखा अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.

उद्घाटन सत्र, पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार

संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी धैर्यशील देशमुख असतील. प्रमुख उपस्थिती म्हणून फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सत्रात पुस्तक व चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच सुरेश शिंदे, महेश बर्वे आणि श्रद्धा वेलणकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. स्व. सुलेखा सुरेश शिंदे यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता पुरस्कार शोभाताई कांबळे यांना प्रदान करण्यात येईल, तर प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या शालेय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील.

व्याख्यान, कथाकथन आणि नांदी संमेलनाची पार्श्वभूमी

दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या दुसऱ्या सत्रात ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ या विषयावर अरुण घोडके यांचे व्याख्यान, रविंद्र कोकरे आणि हिम्मत पाटील यांचे कथाकथन तसेच स्थानिक लेखकांचा सत्कार होणार आहे. जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची’ उपक्रमांतर्गत हे संमेलन होत असल्याची माहिती महादेवराव गुंजवटे आणि अमर शेंडे यांनी दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!