घरफोडीच्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२२ । सातारा । सातारा शहरांमध्ये जुना मोटर स्टँड परिसरात चिकन सेंटरच्या मालकाचा मोबाईल चोरून नेणाऱ्या अल्पवयीन मुलाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शाहूपुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे सहाय्यक पोलीस अधीक्षक असेल तलाल व शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अभिजीत यादव आणि त्यांच्या पथकाने पुण्यातील चोरट्याचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेतला असताना त्यांना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल हँडसेट बाबत तांत्रिक माहिती प्राप्त झाली त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सदरचा गुन्हा उघडकीस आणला सदरची घरफोडी ही चूक एका अल्पवयीन संशयिताने केली असल्याचे निष्पन्न झाले त्याला ताब्यात घेण्यात आली आहे . चोरीस गेलेला मोबाईल हँडसेट सह एक मोबाईल रोख रक्कम असा अकरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार जगदाळे करत आहेत या कारवाईमध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी निलेश फडतरे अमित माने स्वप्निल कुंभार ओंकार यादव सचिन पवार स्वप्निल सावंत यांनी भाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!