‘सिलाई वर्ल्ड’ या भव्य शोरुमचे उद्घाटन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. समवेत पूनम दोशी, नरेश दोशी, महादेव माने.
स्थैर्य, फलटण दि.१७ : संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे ‘सिलाई वर्ल्ड’ फलटणमध्ये दाखल झाले असून पारंपारिक पोषाखांसह आधुनिक फॅशनची वस्त्रे या ठिकाणी मिळणार असल्याने ‘सिलाई वर्ल्ड’ अल्पावधीतच फलटणकरांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण शहरातील रिंग रोड परिसरात दोशी परिवाराच्यावतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या सिलाई वर्ल्ड या भव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे यांचे हस्ते नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सी.जी.लाईफस्टाईलचे संस्थापक चंद्रशेखर गुजर, संचालक सागर गुरव, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, पूनम दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व वयोगाटासाठी सर्व प्रकारची वस्त्रे या भव्य दालनात उपलब्ध असून पारंपारिक पोषाखापासून ते वेस्टर्न वेअरमध्ये विविध प्रकारच्या व्हरायटीज या ठिकाणी फलटणकरांना मिळणार असल्याचे नरेश दोशी व आदेश दोशी यांनी सांगितले.
प्रारंभी दोशी परिवाराच्यावतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.