नोकरांनी केली 13 लाखाची चोरी


 

स्थैर्य, पुणे, दि.१: ज्येष्ठ नागरिक घरामध्ये एकटे
असल्याचा फायदा उठवत नोकरांनी 13 लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना
कर्वेनगर येथील नेशन 52 हॉटेल जवळ घडली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात एका
महिलेसह दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी माधव
फडके(59,रा.ठाणे) यांचे वसु बंगल्यामध्ये एकटेच रहतात. त्यांच्या
देखरेखीसाठी व घरकामासाठी एक महिला व एक पुरुष अशा दोघांची नेमणूक करण्यात
आली आहे.

या दोघांनी नोव्हेंबर 2018 ते
आजवर नजर चुकवून पोटमाळ्यावर ठेवलेले 13 लाख 17 हजार रुपयांचे दागिने
चोरुन नेले. ही बाब नुकतीच लक्षात आल्यावर फिर्यादीने तक्रार दाखल केली.
याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक येवले करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!