
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । सातारा । राज्य पातळीवर प्रतिवर्षी माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार 28 सप्टेंबर 2022 या दिवशी माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी दिली आहे.
या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी व कार्यपद्धती जास्तीत जास्त पोहचविण्याचा शासनाचा मानस आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून माहितीच्या अधिकाराची व कायद्यातील तरतुदींची माहिती दिली जाणार आहे.
