अस्थिर सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी सर्वोच्च पातळीजवळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि.८: बेंचमार्क निर्देशांक आज अस्थिर सत्रात सर्वोच्च पातळीच्या जवळ पोहोचला. सेन्सेक्सने १८१.५४ अंक किंवा ०.४०% ची वृद्धी घेतली व तो ४५,६०८.५१ अंकांवर स्थिरावला. तर दुसरीकडे निफ्टी ०.२८% नी वाढला व बाजार बंद होताना त्याने ३७.२० अंकांची वृद्धी घेत १३,३९२.९५ अंकांची पातळी गाठली. पीएसयू बँकेने नफ्याचे नेतृत्व केले तर फार्मा आणि मेटल स्टॉक्सनी बाजाराला खाली आणले.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एनएसईमध्ये ९१८ स्टॉक्सनी नफा कमावला, ९८० स्टॉक्स घसरले तर ३२० स्टॉक्स स्थिर राहिले. येस बँक, पीएनबी आणि आयडिया आदी स्टॉक्समध्ये संख्येच्या बाबतीत जास्त ट्रेडिंग दिसून आली. तर आरआयएल, एसबीआय आणि मारुतीच्या स्टॉक्समध्ये मूल्याच्या बाबतीत जास्त ट्रेडिंग दिसली. बीएसईमध्ये १,४९३ स्टॉक्सनी नफा कमावला आणि १,४६१ स्टॉक्स घसरले तर १७७ शेअर्स स्थिर राहिले.

सेन्सेक्स आणि निफ्टी: ३० स्टॉक्सचे बॉरोमीटर असलेल्या सेन्सेक्समध्ये १६ स्टॉक्सनी नफा कमावला तर १४ स्टॉक्समध्ये घसरण दिसली. अल्ट्राटेक सिमेंट (३.१५%), टीसीएस (२.२१%), आरआयएल (१.८२%) आणि एचसीएल टेक्नोलॉजीज (१.०६%) हे टॉप गेनर्समध्ये समाविष्ट झाले. तर सन फार्मा (२.३६%), इंडसइंड बँक (२%), एनटीपीसी (१.५५%) आणि एशियन पेंट्स (१.३८%) यांनी नफ्यावर मर्यादा आणल्या.

निफ्टीमध्ये अल्ट्राटेक (३.१९%), टीसीएस (२.१८%) आणि एचसीएल टेक्नोलॉजीज (०.९९%)सह विप्रो (१.४६%) आणि एसबीआयनेदेखील (०.८५%) नफा दर्शवला. हिंडाल्को (२.२१%) आणि कोल इंडिया (१.८६%) ने नुकसानीत भर टाकली.

येस बँक: येस बँकेत गुंतवणुकदारांचा मोठा सहभाग दिसून आल्याने बँकेने ९.८४% चा नफा कमावला. एएमएफआय (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया) कडून बँकेचे अपग्रेडेशन मिडकॅप कॅटेगरीकडून लार्ज कॅपमध्ये होण्याच्या आशेमुळे हे परिणाम दिसले. एआरसीमध्ये ४०,००० कोटी बॅड लोन्स ठेवण्यात आल्याच्या वृत्तामुळेही स्टॉक्समध्ये आणखी वृद्धी दिसून आली.

आदित्य बिरला कॅपिटल लिमिटेड: आदित्य बिरला कॅपिटल लिमिटेडला फायनान्समधील दिग्गज रोमेश सोब्ती यांचे समर्थन मिळण्याचा अंदाज आहे. त्यांनी इंडसइंड बँकेत यशस्वी कामगिरी केलेली आहे. आदित्य बिर्ला कॅपिटलने रिझर्व्ह बँकेकडे सोब्ती यांना मंडळात सहभागी करून घेण्याची परवानगी मागितली होती. सोब्ती हे यापूर्वी अॅडव्हेंटमध्ये त्यांचे ऑपरेटिंग पार्टनर म्हणून सहभागी झाले होते. आदित्य बिर्ला कॅपिटलमध्ये अॅडव्हेंटचा ४.१५% वाटा आहे. इंट्राडे ट्रेडमध्ये या बातमीने ०.४९% ची वृद्धी झाली.

माइंडस्पेस बिझनेस पार्क्स आरइआयटी: मंगळवारी, माइंडस्पेस बिझनेस पार्क्सला यावर्षी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आरईआयटीचा मान मिळाला. डिबेंचर इन्शुरन्सच्या माध्यमातून प्रायव्हेट प्लेसमेंटच्या आधारे यामुळे २०० कोटी रुपयांचा निधी वाढेल, असे म्हटले जात आहे. अपरिवर्तनीय डिबेंचरचे इश्यू १ ते ३ टप्प्यात केले जातील. माइंडस्पेस बिझनेस पार्क्स आरईआयटीचे शेअर्स आज ०.७२% नी वाढून ३३० रुपयांवर पोहोचले.

पनामा पेट्रोकेम: प्रमोटर हुसेन रयानी यांनी शेअर खरेदी केल्याच्या वृत्तानंतर आज पनामा पेट्रोकेम हेडलाइन्समध्ये आली. प्रमोटरने ३ ते ७ डिसेंबरदरम्यान एकूण ९७,४४६ शेअर्स खरेदी केले. त्यामुळे बीएसईमध्ये या स्टॉकमध्ये जास्त खरेदी दिसून आली व १६.६३ टक्के नफा दिसून आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!