
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, दि.४: जैव सुरक्षित वातावरणात खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या १३व्या हंगामावर मॅच फिक्सिंगचे काळे ढग जमा झाले आहेत. फिक्सिंगसाठी ऑनलाइनच्या माध्यमातून एका खेळाडूशी संपर्क केल्याच्या समोर आले आहे. बीसीसीआयच्या अॅन्टी करप्शन युनिटने ही माहिती दिली. संबंधित खेळाडूने ही माहिती युनिटला दिली. संबंधित खेळाडूचे नाव नियमानुसार जाहीर करता येणार नाही, असे युनिटचे प्रमुख अजित सिंह यांनी सांगितले.
