दैनिक स्थैर्य । दि. २७ जानेवारी २०२३ । सातारा । सातारा येथील व्यापारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन, सातारा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते *गुरुप्रसाद उर्फ खंडूशेठ सारडा ( वय 73 ) यांचे आज सायंकाळी 5.20 वाजता पुणे येथे उपचार सुरू असताना दु:खद निधन झाले. गुरुप्रसाद उर्फ खंडूशेठ सारडा यांना पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू, चुलत बंधू, भावजय, पुतणे, असा परिवार आहे .
गुरुवार दि २६ जानेवारी (उद्या) रोजी दुपारी १ वाजता सातारा येथील भवानी पेठ, मारवाडी चौक येथून अंत्ययात्रा निघणार आहे. कैलास स्मशानभूमी सातारा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
खंडूशेठ सारडा यांना काँग्रेसचा जुना वारसा होता. ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व नेते होते. स्मृतीशेष यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर त्यांची अढळ निष्ठा होती . काँग्रेसचे माजी खासदार व ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापरावजी भोसले , तसेच माजी मंत्री स्मृतीशेष विलासराव काका उंडाळकर यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. काँग्रेसची विचारधारा त्यांनी कधीच सोडली नाही. सातारा मार्केट कमिटीवरही ते संचालक म्हणून होते. सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर असत.