शरयू साखर कारखान्याच्या फसवणूक प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा सातारा पोलिसांच्या ताब्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२३ | अहमदनगर |
शरयू कारखान्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. त्यांची सातारा येथील पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी दिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी बनावट कागदपत्रे देऊन कारखान्याचा फसवणूक केल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापकाने दाखल केलेली आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी लोढा यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यासाठी पोलीस अहमदनगरमध्ये आले होते व त्यांनी लोढा यांची चौकशीही केली होती. त्यानंतर गुरुवारी पहाटे लोढा यांना त्यांच्या दूरगाव येथील नातेवाईकांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


Back to top button
Don`t copy text!