फलटण येथील कृषी महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची राष्ट्रीयीकृत बँकेत कृषी अधिकारीपदी निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ३ एप्रिल २०२३ | फलटण |
कृषी महाविद्यालय, फलटण येथील दोन माजी विद्यार्थ्यांची ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीयीकृत बँकेत कृषी अधिकारीपदी निवड झाली आहे. कु. विवेक शिंदे आणि कु. सौरभ कदम अशी निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची केंद्रीय भर्ती एजन्सी आहे. जी गट ‘अ’ अधिकारी पदावर तरुण अंडर ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स आणि डॉक्टरेटच्या नियुक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये कृषि अधिकारी गट ‘अ’ पदाची परीक्षा व मुलाखत घेण्यात आली. राष्ट्रीयीकृत बँकेत कृषी महाविद्यालय फलटण येथील माजी विद्यार्थी कु. विवेक शिंदे आणि कु. सौरभ कदम यांनी राष्ट्रीय स्तरावर गट ‘अ’ पदी निवड मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढविला. सदरील परीक्षेसाठी महाविद्यालयातील स्पर्धा मंचचे मार्गदर्शन लाभले.

कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे मे. गव्हर्निंग कौंसिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधीक्षक श्री. श्रीकांत फडतरे, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे व स्पर्धा मंचचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!