
दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील सुरवडी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी सौ. शरयू जितेंद्र साळूंखे – पाटील विजयी झाले.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.
सूरवडी ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
1) सूर्यकांत पवार
२) संगीता जगताप
३) विजय खवळे
४) नितीन जाधव
५) महेश साळूंखे – पाटील
६) लीना जाधव
७) सुषमा नलवडे
८) बापूराव माडकर
९) ज्योती जगताप