
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाची खो – खो खेळाडू कु. अनामिका लक्ष्मण धनावडे (इ. १२ वी. कला) हिची नंदुरबार येथे होणाऱ्या ४९ वी कुमार – कुमारी राज्यस्तरीय खो – खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस.आर.वेदपाठक व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
