गाव स्तरावर २४ पुरूषांची तर तालुका स्तरावर ३ पुरूषांची ‘सुधारक सन्मान’ पुरस्कारासाठी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२३ | फलटण |
महिला आर्थिक विकास महामंडळ, साताराअंतर्गत ओमसाई व ज्ञानज्योती लोकसंचलित साधन केंद्र, फलटण यांच्यामार्फत तहसील कार्यालय, फलटण येथे ‘पुरूष सुधारक’ पुरस्कारासाठी अर्ज छाननी बैठक दि. २१/०४/२०२३ रोजी तहसीलदार यादव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये गाव स्तरावर २४ पुरूषांची ‘सुधारक सन्मान’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली व तालुका स्तरावर तीन पुरूष निवड करण्यात आली.

या बैठकीला पं. स. फलटण कक्ष अधिकारी शिंदे साहेब व पोलीस निरीक्षक फलटण शहर व एकात्मिक बाल विकास कार्यालायाचे इंगळे, सीएमआरसी व्यवस्थापक, सहयोगिनी, उपजीविका सल्लागार यांच्या उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!