स्थैर्य, सातारा, दि. 20 : सातारा रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बलाचे जवान दुचाकीवरून ड्युटीसाठी येत आहे आणि तो मुंबईला ये-जा करत असल्यामुळे सातारा रेल्वे स्थानक धास्तावले आहे. त्याच्या बेफिकिरी वृत्तीमुळे रेल्वेस्थानकात करोना एंट्री तर करणार नाही ना असा काळजीचा सूर कर्मचाऱ्यांना मधून आळवला जात आहे .सध्या मुंबई व पुण्यात मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्ण आढळत असल्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्याही अधिक वाढत आहे. गेल्या काही दिवसात जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यातील बहुतांश रुग्ण हे ट्रॅव्हल हिस्ट्रीतले आहेत. त्यामुळे साताऱ्यातही बाधीतांची संख्या वाढत आहे.
सातारा रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. या रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अहोरात्र तैनात असतात .या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस स्टेशन, लोहमार्ग पोलीस स्टेशन यासह रेल्वेची विविध कार्यालये आहेत. त्यामुळे याठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दर रोज राबता असतो. .संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेकडून आणि प्रशासन कडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र काही अधिकारी व कर्मचारी या सूचनांचे पालन करताना दिसत नाहीत. रेल्वेच्या सुरक्षेसाठी असलेला रेल्वे सुरक्षा बलाचे जवान साप्ताहिक सुट्टी ला मुंबई येथे दुचाकीवरून ये-जा करत असतो. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्याने त्याच्या मार्फत रेल्वे स्थानकात क रो ना हा शिरकाव होऊ शकतो. परंतु याचे संबंधित जवानाला काही देणे घेणे नाही. स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मात्र ही रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस कर्मचारी उपदेशाचे डोस देत असतात. मात्र ते स्वतः नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यांनी प्रवाशांना उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. माझे आरोग्य माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक या तत्त्वानुसार स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा सातारा रेल्वे स्थानकही करोना बाधित होण्यास वेळ लागणार नाही.