जिल्ह्यात २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत कलम ३६ लागू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर  येथे शासनाच्यावतीने दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी शिवप्रताप दिन साजरा केला जाणार आहे.  यावेळी कायदा व सुव्यवस्थ बंदोबस्तासाठी कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांचेहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे अधिकार  दि. 29 नोव्हेंबर 2022 चे 13.00 वा.पासून ते दि. 1 डिसेंबर 2022 चे 08.00 वा. पर्यंत च्या कालावधीकरिता प्रदान केले आहे.

या अधिकारानुसार त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मोटार वाहनाच्या नियमना संदर्भात, कार्यक्रमासाठी जाणारे-येणारे मार्गाातील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन/ हालचाल कशी असावी, ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे अथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!