सिडकोने उभारलेल्या पत्रकार भवनाची माहिती सचिवांकडून पाहणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि.१२: राज्याचे माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सिडकोने उभारलेल्या नवी मुंबईतील पत्रकार भवनाची पाहणी केली.

त्यांच्यासमवेत कोकण विभागाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे, नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला हे होते. नवी मुंबई शहर, परिसरात पत्रकारांसाठी सिडकोने उभारलेली वास्तू भविष्यात माध्यमांसाठी, पत्रकारांसाठी उपयोगात येऊ शकते. माहिती व जनसंपर्क विभागालादेखील भविष्यात या भवनाचा उपयोग होऊ शकेल असे डॉ.पांढरपट्टे यांनी सांगितले. सिडकोकडून या भवनाची उभारणी करण्यात आली असून आतील कामे सुरु आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!