प्रिय दादा,
आज तुम्हाला आमच्यातून जाऊन दोन वर्षे पूर्ण झाली. या सगळ्या धकाधकीच्या जीवनात सतत एक रिक्तपणा जाणवत राहतो.
‘या जन्मावर, या जगण्यावर शतद: प्रेम करावे’, असे तुम्ही नेहमी म्हणायचा आणि तसंच अगदी सर्वांवर निर्व्याज प्रेम करत तुम्ही जगलात. तुमच्या संग्रही असलेलं तुमच लिखाण जेव्हा आता कळतंय, तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो, खूप धन्य वाटते की, तुमच्यासारखे पालक, गुरू आम्हाला लाभले…
तुम्हालाही खूप समाधान वाटत असणार नक्कीच…
तुमचा शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, कौटुंबिक वारसा तुमची पुढची पिढी पुढे नेत आहे.
‘काळ पुसू शकणार नाही,
तुमच्या कार्याच्या आठवणी…
मार्ग दाखवित राहील,
तुमचे चरित्र क्षणोक्षणी…
तुमची सेवा, तुमचा त्याग,
स्मरत राहते मन…
नि:स्वार्थी सेवेस तुमच्या,
विनम्र अभिवादन… विनम्र अभिवादन…
तुमचे शुभाशिर्वाद असेच नेहमी आम्हा सर्व कुटुंबियांवर, तुमच्या सर्व प्रियजनांवर राहोत, हीच पांडुरंगचरणी प्रार्थना…