
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १५ एप्रिल २०२३ । मुंबई । भारतीय प्रेस परिषदेच्या शोध समितीची बैठक १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून सह्याद्री अथितीगृह, मुंबई येथे होणार आहे. न्यायमूर्ती श्रीमती रंजना प्रकाश देसाई अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत पत्रकारितेशी निगडित विविध ३६ प्रकरणांवर सुनावणी होईल. ही सुनावणी माध्यमे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली राहील, असे भारतीय प्रेस परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.



