
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑक्टोबर २०२१ । वाई । वाई तालुक्यातील बोपेगाव येथील सत्यशोधक विचाराचे ज्येष्ठ कार्यकर्ते एडवोकेट आनंदराव शिंदे (९५) यांचे सातारा येथील खाजगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्यामागे मुलगा , मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. वाई पंचक्रोशीतील कृषी पदवी मिळवणारे १९५० सालचे ते पहिले पदवीधर होत. त्यांनी नोकरी करीत असताना एल एल बी चे शिक्षण पूर्ण केले. केंद्र सरकारच्या कस्टम खात्यातून असिस्टंट कलेक्टर म्हणून ते निवृत्त झाले. आयुष्यभर सत्यशोधकीय विचार त्यांनी जोपासले. त्यांच्या मुलाचे व नातवांचे विवाह त्यांनी सत्यशोधकी पद्धतीने लावले. देहदान व नेत्रदानाची त्यांची इच्छा मात्र कोरोना च्या संसर्गामुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्यांच्या आठवणी सांगणारे “आनंद यात्री ” हे आत्मचरित्र पर पुस्तक वाचनीय असे आहे.



