
स्थैर्य, फलटण : फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी फलटण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी रक्तदान करुन युवकांच्या पुढे आदर्श निर्माण केला.
शिबिराचे उद्घाटन आमदार दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर नगराध्यक्षा सौ.निताताई मिलिंद नेवसे, युवा नेते मा.श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद राजाराम नेवसेसतीश धुमाळ, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.ए.आर.गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा मा.सौ.रेश्माताई राजेंद्र भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, सौ.लतिकाताई अनपट, सौ.राजश्रीताई शिंदे, सौ.निलिमाताई देशमुख, सौ.निलिमा दाते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक संघटनेचे नितीन मदने, सिकंदर डांगे, माधव जमदाडे, प्रशांत नाळे, मा.श्री.श्रीधर कदम, आकाश सोनवलकर, अभिजीत निंबाळकर, ओंकार कदम, अक्षय पवार, गौरव नष्टे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोविड 19 च्या सध्याच्या बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी अतिशय शिस्तबद्धरित्या सोशल डिस्टंसिंग ठेवून पक्षाच्या सर्व फ्रंटचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रक्तदान केले.
यासाठी फलटण ब्लड बँक, फलटण डॉ.बिपिन शहा व त्यांचे सहकारी, प्रा.सुधीर इंगळे सर, प्रा.संतोष धुमाळ व त्यांच्या सर्व सहकार्यांचे मोलाचे योगदान लाभले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी फलटण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुधोजी महाविद्यालय, फलटण (एनसीसी/एनएसएस), गोविंद मिल्क, फलटण यांचे बहुमोल सहकार्य मिळाले, अशी माहिती राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी दिली.