तावडी येथील शेतमजुराची आत्महत्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण : तावडी ता. फलटण येथील एका शेतमजुराने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर बाळू भंडलकर वय 50 वर्षे असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

तावडी ता. फलटण येथे सकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला असून भंडलकर यांनी त्यांच्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचा मुलगा नवनाथ ज्ञानेश्वर भंडलकर हा सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्रकार त्यांना समजला. या बाबत त्यांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात  आकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे.

मयताच्या घरी त्याची पत्नी व दोन मुले आहेत ते ट्रॅक्टर डायव्हर म्हणून काम करत होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या मार्गदशनाखाली पोलिस हवालदार किशोर गिरी करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!