
दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण येथे प्रसिद्ध असलेल्या मे. सगुणामाता कन्स्ट्रक्शनचे संचालक दिलीप शिंदे यांचे कनिष्ठ सुपुत्र सत्यजित शिंदे उच्च शिक्षणासाठी परदेशी रवाना होणार आहेत. त्याबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे यांनी सत्यजित शिंदे यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मे. सगुणामता कॅन्स्ट्रकशनचे श्री. दिलीपराव शिंदे सर यांचे कनिष्ठ चिरंजीव सत्यजित शिंदे हे १० ऑगस्ट २०२३ रोजी ग्रीन सिटी, साऊथ कोरोलीना, अमेरिका येथे ‘एमएस-अॅटोमोटीव्ह इंजिनिअरिंग’ या शिक्षणासाठी जाणार आहेत.