दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
तारपाल भिल वस्ती मरमोला, जिल्हा उदयपूर येथील आदिवासी महिलेची हत्या करणार्या राजपूत समाजातील आरोपीला फाशी देण्याची मागणी फलटण येथील कामगार संघर्ष संघटनेकडून फलटणचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, उदयपूर येथील आदिवासी महिलेची हत्या करणार्या राजपूत समाजाच्या आरोपीला फाशी देण्यात यावी. कारण या देशात आज लहान मुलींपासून वृध्द महिलांपर्यंत कोणीच सुरक्षित राहिले नाहीत. त्याचबरोबरच आता देशात खैरलांजी, निर्भया, मणिपूरसारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे उदयपूर येथील आदिवासी महिलेचा झालेल्या निर्घृण हत्येचा कामगार संघर्ष संघटना निषेध करत आहे. राजपूत समाजाचे लोक फलटण शहरात स्थानिक व्यावसायिकांना त्रास देत आहेत. हे लोक फलटण शहरातून गेले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे.
हे निवेदन देतेवेळी कामगार संघर्ष संघटनेचे सनी काकडे, मंगेश आवळे, महादेव गायकवाड, अमर झेंडे आदी उपस्थित होते.