
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, 26 मार्च, सातारा : सातारा शहरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे (थोरले) नगर वाचनालयाच्या प्रांगणातील जागेत मर्यादित वाहनांसाठी पार्किंग सुविधा आहे. मात्र वाचनालय बंद झाली तरी दिवसभर येथे कोणी यावे आणि दुचाकी लावून जावे. असाच प्रकार असल्यामुळे येथे गैरप्रकार व अवैध धंद्यांनाही ऊत येत असतो. त्यामुळे हे वाहनांचे पार्किंग स्थळ तातडीने बंद करावे. येथून ये – जा करणार्या नागरिकांना निदान चालत जाता येईल एवढी तरी वाट मोकळी ठेवावी अशीच अपेक्षा सातारकर नागरिक करत आहेत .(छाया – अतुल देशपांडे)
