आर्यांग्ल हॉस्पिटल परिवाराच्या कार्यविस्तारासाठी सातारकरांनी सहभाग द्यावा

श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे भोसले; अतिदक्षता विभागातील डायलिसिस विभागाचे उद्घाटन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा – येथील आर्यांग्ल हॉस्पिटल मधील डायलिसिस विभागाचे उद्घाटन करताना श्री.छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले. त्यावेळी अजित मुथा, विनोद झंवर, सुभाष दोशी, सचिन दोशी, डॉ. नितीन आरसुळ व इतर मान्यवर.

स्थैर्य, सातारा, दि. 21 नोव्हेंबर : ‘आर्यांग्ल हॉस्पिटल, म्हटले की सातारा’ अशी एक वर्षानुवर्षे सुरू असलेली आरोग्य सेवेची परंपरा आज विविध नवनवीन आरोग्य सुविधांनी विस्तारित होत आहे. आर्यांग्ल परिवाराच्या बांधण्यात येत असलेल्या नव्या भव्य इमारत तसेच विविध आरोग्य सुविधांच्या सोयींसाठी समस्त सातारकरांनी आपलेपणाने या कार्यात सहभाग तन, मन, धन अर्पून घ्यावा, असे आवाहन श्री. छ.सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी काढले.

येथील आर्यांग्ल हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या समारंभास माजी नगराध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले, आर्यांग्ल परिवाराचे अध्यक्ष बाळकृष्ण जाजू, चेअरमन अजित मुथा, सेक्रेटरी विनोद झंवर, डॉ. प्रकाश चव्हाण, अनुप मुथा, मेघना बाफना, प्राचार्य डॉ. विनोद पतंगे, डॉ. नितीन आरसुळ, सौ. प्रेमा मुथा अनुप मुथा, मेघना बाफना, श्री व सौ. सुभाष दोषी, सचिन दोशी, डायलिसिस विभागाचे देणगीदार, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, राजेंद्र चोरगे, डॉ. नावंदर, डॉ. अरुणा फिरोदिया आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर श्री. छ. सौ. वेदांतिका राजे भोसले यांनी डायलिसिस विभागाचे सविस्तर माहिती घेऊन पाहणी केली.

चेअरमन अजित मुथा म्हणाले की, अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीने आर्यांग्ल सेवा विस्तार करीत आहे. त्यामध्ये दोशी परिवाराने दिलेली सढळ मदत ही या नव्या डायलिसिस विभागाच्या कार्यासाठी मोलाची ठरलेली आहे. सातारकरांनी या आरोग्य सेवेत सहभाग घ्यावा. अतिशय अल्पदरात या सेवेचा उपयोग समाजातील गोरगरीब व गरजू रुग्ण व्यक्तींना होणार आहे याचा विशेष आनंद होत आहे.

सुभाष दोशी म्हणाले की, सातारा आणि आर्यांग्ल हे एक नाव आज शतकी वाटचाल करताना दोशी परिवाराच्यावतीने या कार्यात सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून समाज ऋण म्हणून ही मदत करताना आम्हाला मोठा आनंद झाला. आर्यांग्ल परिवाराचा असाच कार्यविस्तार भविष्यात वृद्धिंगत होवो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो.

प्रारंभी दीप प्रज्वलन, धन्वंतरी पूजन करण्यात आले. मंदार बोकील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनोद पतंगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास आयुर्वेद प्रसारक मंडळीचे सर्व संचालक मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!