

सातारा शहरात रविवार, १० मे रोजी सूर्य डोक्यावर आल्यावर सावली गायब होण्याचा ‘शून्य सावली दिवस’ सातारकरांना अनुभवता आला. मागील काही दिवसांपासून या खगोलीय घटनेची सातारकरांमध्ये उत्सुकता होती, जी आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.
स्थैर्य, सातारा, दि. १० : सातारा शहरात रविवार, दिनांक १० मे रोजी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर सावली गायब होण्याचा अद्भुत क्षण सातारकरांना प्रत्यक्ष अनुभवता आला. निसर्गप्रेमी आणि खगोलप्रेमींसाठी हा आगळावेगळा ‘शून्य सावली दिवस’ (Zero Shadow Day) खऱ्या अर्थाने एक मोठी पर्वणी ठरला.
यादोगोपाळ पेठेतील दृश्ये कॅमेऱ्यात कैद
शहरातील यादोगोपाळ पेठ आणि परिसरातील रस्त्यांवरून जाणारी वाहने, तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या पायाखाली त्यांची सावली अजिबात दिसून येत नव्हती. हा निसर्गाचा चमत्कार आणि विज्ञानाचा खेळ अनुभवताना नागरिकांमध्ये मोठे कुतूहल पाहायला मिळाले.
पत्रकार अतुल देशपांडे यांनी ही खास दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.
