महामानवास साताऱ्यात अभिवादनं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.७: राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील आंबेडकरांच्या पुतळ्याला विविध संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

डॉ आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेसमोरील उद्यानात असणाऱ्या आंबेडकर पुतळा परिसरात शामियाना उभारण्यात आला होता . साताऱ्यासह अवध्या जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले . रविवारी डा आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला .. मध्यरात्रीपासूनच अभिवादन पर्वा ला सोशल डिस्टन्सिंग पाळून सुरवात करण्यात आली होती . दिवसभर आंबेडकर प्रेमींची पुतळा परिसरात ये जा होती .क रोना संक्रमणाच्या मर्यादेमुळे अभिवादन कार्यक्रमांना सशर्त परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून होती मात्र गर्दी होणार नाही यांची काळजी देण्याची सक्त ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती . रिपाई संघटनेच्या वतीने पुतळा परिसराच्या उद्यानात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिराला तरुण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!