दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील सातारा परिवहन विभागाच्या 27 कंत्राटी कर्मचाऱ्यांना करोना काळातील वेतन अद्याप मिळालेले नसल्याने त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले.
महाबळेश्वर, वाई, कराड, पाटण, मेढा, सातारा, वडूज येथील 27 कर्मचाऱ्यांनी कंत्राटी तत्वावर परिवहन विभागांमध्ये कोरोनाच्या काळात सेवा बजावली होती. मात्र, गेल्या सहा महिन्यापासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक चणचण झाल्याने संबंधित 27 कर्मचाऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले त्यांच्या व्यथांची दखल घेऊन उदयनराजे भोसले यांनी विभाग नियंत्रक सागर पळसुले यांच्याशी संपर्क साधून संबंधितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला व हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली.
कर्मचाऱ्यांनी उदयनराजे भोसले यांच्यासह सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे जाऊन दाद पाहण्याचा प्रयत्न केला या निवेदनात नमूद आहे की गेल्या काही महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे कौटुंबिक आणि आर्थिक अडचणी प्रचंड वाढल्या आहेत त्यामुळे एसटी महामंडळाने आम्हाला सेवेत सामावून घेऊन आमची कार्तिक अडचण सोडवावी अशी विनंती आणि निवेदनात करण्यात आली आहे.