राज्यात तीव्र दुष्काळाची छाया; साताऱ्यातील शाही विजयादशमी सोहळा अतिशय साधेपणाने होणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलमंदिर पॅलेस येथील ऐतिहासिक विजयादशमी सिमोल्लंघन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १२ ऑक्टोबर : यंदा विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाची दाहकता पसरली असून राज्यातील ३०० पेक्षा जास्त तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे तीव्र अवर्षण परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी व नागरिकांचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरू आहे. या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे होणारा शाही विजयादशमी सिमोल्लंघन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाचा निर्णय

सातारचा ऐतिहासिक विजयादशमीचा शाही सिमोल्लंघन सोहळा हा संपूर्ण सातारkरांचा सोहळा मानला जातो. या पर्वात भवानी तलवार आणि आई तुळजाभवानीचे विधिवत पूजन, शाही पालखी मिरवणूक आणि आपट्याचे सोने स्वीकारण्याचा सोहळा पार पडतो. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाले असून जनावरांचा प्रश्न बिकट बनला आहे. अशा परिस्थितीत शाही सोहळा मोठ्या डामडौलात साजरा करणे योग्य वाटत नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांना व कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन

प्रथा आणि परंपरेनुसार सिमोल्लंघन सोहळा पार पडेल, परंतु तो अत्यंत साधेपणाने होईल. या सोहळ्यात कोणतीही बॅनरबाजी किंवा अनावश्यक खर्च टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील उधळपट्टी टाळून नागरिकांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शक्य ते कार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!