सातारा शहरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; पूजेचे साहित्य अन् फलाहाराच्या बाजारात मोठी गर्दी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात पूजेचे साहित्य, सुगंधी फुलांचे गजरे, विड्याची पाने आणि फलाहाराच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ११ ऑक्टोबर : संपूर्ण देशभरात सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची धामधूम सातारा शहरातही पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत पूजेचे साहित्य, सुगंधी फुलांचे गजरे आणि विड्याच्या पानांच्या खरेदीसाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे.

पूजा साहित्य व फलाहाराच्या बाजारात तेजी

नवरात्र काळात अनेक देवीभक्त नऊ दिवसांचे कडक उपवास करतात. या उपवासासाठी फलाहाराला विशेष महत्त्व असल्याने बाजारपेठेत रताळी, काकडी आणि बटाटे यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. भाजीमंडई आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली आहे.

विड्याची पाने अन् फुलांना विशेष मागणी

देवीच्या पूजेसाठी लागणारी विड्याची पाने आणि सुगंधी फुलांचे गजरे यांना नवरात्रात मोठी मागणी असते. त्यामुळे सातारच्या मुख्य बाजारपेठेत विविध स्टॉल्सवर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली असून शहरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!