पिंपरे येथे हवामानपूरक ऊस शेती कार्यशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचे थेट सादरीकरण; शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक येथे सिंजेंटा फाऊंडेशन आणि EDF कडून आयोजित कार्यशाळेत हायड्रोजेल, बायोचार आणि सोलर लाईट ट्रॅपचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

स्थैर्य, खंडाळा, दि. ०८ ऑक्टोबर : बदलत्या हवामानाचा आणि दुष्काळाचा मुकाबला करून उसाचे शाश्वत उत्पादन वाढवणे तसेच रासायनिक खतांचा वापर टाळून शेतीचा खर्च कमी करण्यासाठी पिंपरे बु।। (धायगुडे मळा) येथे हवामान-अनुकूल ऊस पीक प्रक्षेत्र भेट व शेतकरी परिसंवाद कार्यशाळा पार पडली. सिंजेंटा फाऊंडेशन इंडिया (SFI) आणि एन्व्हायर्नमेंटल डिफेन्स फंड (EDF) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयोगशील शेतकरी शांताराम धायगुडे यांच्या ऊस प्रात्यक्षिक क्षेत्रावर आयोजित या उपक्रमास खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

शासकीय योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

सहाय्यक कृषी अधिकारी अशोककुमार आघाव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवत शासकीय योजनांची माहिती दिली आणि हवामानपूरक तंत्रज्ञान अंगीकारण्याचे आवाहन केले. EDF चे हवामानपूरक शेती मॅनेजर अमरेष चौधरी आणि SFI चे विभाग प्रमुख डॉ. गजानन राजूरकर यांनी प्रकल्पाच्या जागतिक व राष्ट्रीय उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. नेटाफिमचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ सतीश राठोड यांनी सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे अचूक नियोजन व अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले.

शेतात थेट प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

या कार्यशाळेत जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणारे ‘हायड्रोजेल’ आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणारे ‘बायोचार’ याचे सॅम्पल दाखवून माहिती देण्यात आली. रासायनिक फवारणीचा खर्च वाचवून हुमणी व खोडकिडीचा नैसर्गिक बंदोबस्त करणाऱ्या सौर ऊर्जेवरील ‘सोलर लाईट ट्रॅप’ यंत्राचे कार्य दाखवण्यात आले. उसाचे पाचट न जाळता ते जागेवरच कुजवून खत बनवण्याची ‘वेस्ट डीकंपोजर’ प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवण्यात आली. सातारा जिल्हा समन्वयक कैलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रकल्प अधिकारी किरण कंक, ऋषिकेश झगरे व कृषी उद्योजक उमांजली धायगुडे यांनी नियोजन सांभाळले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!