साताऱ्याचा सुपुत्र हर्षल बोटे याची यूपीएससी (UPSC) परीक्षेत गरुडझेप; देशात ४१ वा क्रमांक!


 साताऱ्यातील ‘छ. शाहू अकॅडमी’चा माजी विद्यार्थी हर्षल सुनील बोटे याने यूपीएससीच्या ‘भारतीय वन सेवा’ (IFS) परीक्षेत देशात ४१ वा क्रमांक मिळवून जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.

स्थैर्य, सातारा , दि. ११ :  साताऱ्यातील विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ‘छत्रपती शाहू अकॅडमी’चा माजी विद्यार्थी हर्षल सुनील बोटे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने यूपीएससीच्या ‘भारतीय वन सेवा’ (Indian Forest Service – IFS) परीक्षेत देशात ४१ वी रँक मिळवून साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

नोकरी सांभाळून मिळवले यश:

विशेष म्हणजे, हर्षल बोटे हा सध्या नवी दिल्ली येथील ‘वस्त्रोद्योग मंत्रालयात’ (Ministry of Textiles) ‘सहाय्यक विभाग अधिकारी’ म्हणून कार्यरत आहे. आपली नोकरी आणि त्यातील जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत त्याने या कठीण परीक्षेत हे दैदिप्यमान यश मिळवले आहे.

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव:

हर्षलच्या या मोठ्या यशाबद्दल विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, शाहू अकॅडमीच्या प्राचार्या सौ. डिंपल जाधव आणि सर्व शिक्षक वर्गाने त्याचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे. हर्षलच्या या यशामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Back to top button
Don`t copy text!