साताऱ्याचा सुपुत्र डॉ. ओंकार फडतरे याची यूपीएससी (UPSC) परीक्षेत उत्तुंग भरारी; देशात ३० वा क्रमांक!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ‘छत्रपती शाहू अकॅडमी’चा माजी विद्यार्थी डॉ. ओंकार फडतरे याने यूपीएससी परीक्षेत ‘ऑल इंडिया’ ३० वी रँक मिळवून साताऱ्याचे नाव उज्वल केले आहे. ‘फॉरेस्ट ऑफिसर’ म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ११ : सातारा येथील विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ‘छत्रपती शाहू अकॅडमी अँड सायन्स जुनिअर कॉलेज’चा दहावीचा माजी विद्यार्थी डॉ. ओंकार फडतरे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने या प्रतिष्ठेच्या परीक्षेत संपूर्ण भारतातून ३० वा क्रमांक (All India Rank 30) मिळवून साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

‘फॉरेस्ट ऑफिसर’ म्हणून नियुक्ती:

यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे डॉ. ओंकार फडतरे याची ‘भारतीय वन सेवा’ (Indian Forest Service – IFS) अंतर्गत ‘फॉरेस्ट ऑफिसर’ (वन अधिकारी) म्हणून दिमाखात नियुक्ती झाली आहे.

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव:

डॉ. ओंकार याच्या या बहुमूल्य यशाबद्दल विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. डिंपल जाधव यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच, त्याच्या भावी प्रशासकीय वाटचालीसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

छत्रपती शाहू अकॅडमीच्या आणखी एका विद्यार्थ्याने (याआधी हर्षल बोटे – ४१ वा क्रमांक) या परीक्षेत यश मिळवल्याने शाळेच्या आणि साताऱ्याच्या नावलौकिकात मोठी भर पडली असून, सर्वत्र डॉ. ओंकार फडतरे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!