सातारा : पर्यटकांच्या गर्दीने टाेल नाक्यांवर ‘दिवाळी’


 

स्थैर्य, सातारा, दि.१५ : दिवाळी सुटी निमित्त पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुण्यातील नागरिक महाबळेश्वर, पाचगणी, काेल्हापूर, काेकणासह गाेव्याला जातानाचे चित्र पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दिसत आहे. यामुळेच तब्बल आठ महिन्यांनंतर आनेवाड़ी आणि तासवडे या दाेन्ही टोल नाक्यांवर आज (रविवार) सकाळपासून वाहनधारकांची वर्दळ दिसत हाेती. दरम्यान काेराेनाच्या पार्श्वभुमीवर या दाेन्ही टाेल नाक्यांवर आवश्यक त्या उपयायाेजना केल्या गेल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

सायगाव : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या आनेवाड़ी टोल नाक्यावर दिवाळीच्या तोंडावर शुक्रवार पासूनच मोठ्या प्रमाणात वाहतुक जाम हाेत हाेती. मात्र टोल व्यवस्थापनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चोख काळजी घेण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळत हाेता. नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या येथील टोल नाक्यावर गेल्या आठ महिन्यांपासुन कोरोनामुळे वाहतूकीचे प्रमाण कमी होत हाेते. दिवाळीच्या निमित्ताने शहरात कामाला असणारे चाकरमानी सणासाठी गावी परतु लागल्याने पुण्याहून साताराला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टाेल व्यवस्थापनाकड़ून येथे प्रवाशांची व्यवस्थित काळजी घेतली जात होती. फास्ट टॅगमुळे देखील जास्त गर्दी न होता वाहने पुढे सरकताना दिसत होती. येथे प्रत्येक बूथवर सॅनिटायझरचा वापर केला जात असल्याने कर्मचारी आणि प्रवासी या दाेघांची काळजी घेताना आढळले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!