दैनिक स्थैर्य | दि. १४ मार्च २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयामध्ये सातारा विभागीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.
मुधोजी महाविद्यालय,फलटण येथे संपन्न झालेल्या सातारा विभागीय शूटिंग व्हॉलीबॉल पुरूष स्पर्धेमध्ये शहाजीराजे महाविद्यालय खटाव – प्रथम, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा – द्वितीय, मुधोजी महाविद्यालय फलटण – तृतीय व कला व वाणिज्य महाविदयालय नागठाणे – चतुर्थ यांनी यश मिळविले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले.